Dailyhunt
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींचे कष्ट संपले! 'मे' चा पहिलाच आठवडा जॅकपॉटचा! पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींचे कष्ट संपले! 'मे' चा पहिलाच आठवडा जॅकपॉटचा! पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

ABP माझा 1 week ago

Weekly Horoscope 4 To 10 May 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आजपासून (May 2026) मे महिन्याचा पहिलाच आठवडा सुरु झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 4 ते 10 मे 2026 पर्यंतचा हा नवीन आठवडा असणार आहे.

या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मे महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील, पण तुम्ही मेहनतीने त्या पूर्ण करू शकाल. आर्थिक बाबतीत अचानक खर्च येऊ शकतो, त्यामुळे बचतीकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांतपणे संवाद साधा

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. नोकरीत किंवा व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे योग आहेत, विशेषतः पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि एखादी शुभ बातमी मिळू शकते. प्रेमजीवनात स्थिरता राहील.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा कामात यश मिळेल. नवीन ओळखी निर्माण होतील, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण मिळतील. प्रवासाचे योग आहेत.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी थोडे संवेदनशील वाटू शकते. कुटुंबाशी संबंधित काही निर्णय घ्यावे लागू शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. प्रेमसंबंधात समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी हा आठवडा काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. अचानक बदल किंवा आव्हाने येऊ शकतात. आर्थिक बाबतीत उत्पन्न चांगले राहील, पण खर्च वाढू शकतो. प्रेमजीवनात थोडा तणाव संभवतो. आरोग्याच्या दृष्टीने तणाव टाळा

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. करिअरमध्ये प्रगती, नवीन प्रोजेक्ट्स आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आरोग्य चांगले राहील.

हेही वाचा

Shani Dhaiyya: खूप सोसलं, आता फक्त 1 च वर्ष! 2027 पर्यंत 2 राशींवर शनिची ढैय्या कायम, पैसा, करिअर, प्रेमात 'अशी' काळजी घ्याल...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha