Weekly Horoscope 1 To 7 June 2026: आजपासून जून महिना सुरू झाला आहे. आणि त्यासोबतच या महिन्याचा (June 2026) पहिलाच आठवडा देखील सुरु झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 1 ते 7 मे 2026 असा या आठवड्याचा कालावधी आहे.
ज्योतिषींच्या मते, पुढचे 7 दिवस अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या काळात, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. जून महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी जूनच्या पहिलाच आठवडा उत्साहवर्धक राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. प्रेम जीवनात आनंद आणि जवळीक वाढेल. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक राहील.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कामाच्या ठिकाणी संयम आणि शहाणपणाने निर्णय घ्यावे लागतील. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी जून महिन्याचा पहिला आठवडा नवीन ओळखी आणि संपर्कांमुळे फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. प्रेम जीवन रोमँटिक राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. भावनिक निर्णय घेणे टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषतः पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी नवीन आठवडा भाग्याची साथ मिळाल्याने अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत राहील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. प्रेम जीवन आनंदी राहील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात संयम आणि मेहनत महत्त्वाची ठरेल. कामात बारकाईने लक्ष दिल्यास यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवा.
हेही वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

