Weekly Horoscope 4 To 10 May 2026: अखेर आजपासून (May 2026) मे महिन्याचा नवा आठवडा सुरु झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 4 ते 10 मे 2026 पर्यंतचा हा नवीन आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे.
या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मे महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. मनात थोडी अस्थिरता जाणवू शकते, पण परिस्थिती हळूहळू सुधारेल. आर्थिक बाबतीत संतुलन राखा. नोकरीत बदल किंवा नवीन संधी मिळू शकते. प्रेमसंबंधात संयम आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण टाळा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवड्यात धैर्य आणि संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबतीत फायदा होऊ शकतो, विशेषतः गुंतवणुकीतून. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल. प्रेमसंबंधात समजूतदारपणा ठेवा. आरोग्य चांगले राहील.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा पहिला आठवडा कामात यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत. आर्थिक बाबतीत खर्च वाढेल, पण उत्पन्नही ठीक राहील. प्रेमसंबंधात सौम्यता ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा जाणवू शकतो.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा प्रगतीचा आणि यशाचा आहे. करिअरमध्ये मोठ्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंद आणि स्थिरता राहील. प्रेमजीवन चांगले राहील. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी मे महिन्याचा पहिला आठवडा जीवनात काही बदल जाणवतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. नोकरीत ताण येऊ शकतो. प्रेमसंबंधात थोडा अंतर ठेवणे योग्य ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने विश्रांती घ्या.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा कामात यश मिळेल, पण थकवा जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढेल, पण खर्चही वाढेल. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने पचन आणि झोपेची काळजी घ्या.
हेही वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

