Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Welcome To The Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची BOX ऑफिसवर 'शंभरी', 'अल्फा'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

Welcome To The Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची BOX ऑफिसवर 'शंभरी', 'अल्फा'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

ABP माझा 5 days ago

Welcome To The Jungle Crosses 100 Crore: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the jungle) या सिनेमाने चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. 9 दिवसांत या सिनेमानं 100 कोटींचा (Box Office collection) आकडा पार केला.

या कॉमेडी अॅडव्हेंचर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. 34 कलाकारांची फौज असलेल्या सिनेमाने ऑडियन्सला थिएटरपर्यंत खेचण्यात यश मिळवले आहे. शनिवारी म्हणजेच 9 व्या दिवशी या सिनेमाने उत्तम कामगिरी केली. आज रविवारीही हा सिनेमा उत्तम कामगिरी करु शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या सिनेमाने 9 व्या दिवशी जबरदस्त कमाई करुन या सिनेमाने आलिया भट्टच्या 'अल्फा'ला पछाडलं. या सिनेमाने शनिवारी नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

या सिनेमाने आतापर्यंत किती कोटींचे कलेक्शन केले आहे? (Welcome to the Jungle Box Office Collectio Day 9)

'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा 26 जून रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने पहिल्या दिवशी 15 कोटींचे कलेक्शन केले होते. तर, पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 93 कोटींचे कलेक्शन केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने शुक्रवारी 4.50 कोटींचे कलेक्शन केले. तर, शनिवारी या सिनेमाने 7.35 कोटी रुपयांची कमाई केली. एकूण 9 दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला.

'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने एकूण 9 दिवसांत 105 कोटींचे कलेक्शन केले. आज रविवार असल्यामुळे हा सिनेमा आणखी कमाई करु शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मल्टीस्टारर हा सिनेमा आणखी किती कोटींचे कलेक्शन करेल? याची उत्सुकता अक्षय कुमारच्या चाहत्यांना आहे. वृत्तानुसार, या सिनेमाने त्याचे डिजिटल, संगीत आणि सॅटलाइट हक्क विकून आपला खर्च वसूल केलाय. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचे करेल? याची मेकर्सना जास्त चिंता नाही.

दरम्यान, अक्षय कुमारने या सिनेमासाठी कमी मानधन घेतले होते. आता अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रॉफिटमधून आपला वाटा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सिनेमात 34 कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त या सिनेमात सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडीझ, रवीना टंडन, लारा दत्ता, राजपाल यादव यांसह इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहे. फिल्मच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती समोर आली आहे, हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होऊ शकते. पण याची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

इतर बातम्या:

'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha