Dailyhunt
Yuzvendra Chahal And Tania Chatterjee: युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ

Yuzvendra Chahal And Tania Chatterjee: युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ

ABP माझा 6 days ago

Yuzvendra Chahal And Tania Chatterjee IPL 2026: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि सध्या आयपीएलच्या (IPL 2026) हंगामात पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून खेळणारा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अभिनेत्री आणि मॉडल तानिया चॅटर्जी (Tania Chatterjee) हिने युझवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर मेसेज केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे तानिया चॅटर्जी हिने काल मीडियासमोर युझवेंद्र चहलने मला मेसेज केला असल्याचं सांगितले. तसेच युझवेंद्र चहलने कोणते मेसेज केले, ते देखील तानिया चॅटर्जीने माध्यमांच्या कॅमेरासमोर दाखवले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर युझवेंद्र चहलची चर्चा रंगली आहे.

तानिया चॅटर्जी काल पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाली. यावेळी तिने युझवेंद्र चहलने मला मेसेज केल्याचं सांगितले. तसेच पुढे युझवेंद्र चहलने दोन व्हिडीओ पाठवून Cute..असा तानिया चॅटर्जीला मेसेज केला आहे. तानिया चॅटर्जीने हे मेसेज थेट कॅमेऱ्यासमोर दाखवले. सध्या तानिया चॅटर्जीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Yuzvendra Chahal Msg To Tania Chatterjee)

कोण आहे तानिया चॅटर्जी? (Who Is Tania Chatterjee)

30 वर्षीय तानिया चॅटर्जी ही कोलकाता, पश्चिम बंगाल येथील एक भारतीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, तानिया चॅटर्जीने 2020 मध्ये मनोरंजन विश्वात पदार्पण केले. तानिया चॅटर्जी प्रामुख्याने तिच्या ओटीटी (OTT) वेब सीरिज आणि धाडसी फोटोशूटसाठी ओळखली जाते. 'चिराईया' (Chiraiya) या जिओ हॉटस्टारवरील वेब सीरिजमध्ये तिने काम केले आहे. तिने बंगाली आणि हिंदी ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे, ज्यामध्ये बोल्ड दृश्यांचा समावेश असतो.

युझवेंद्र चहलचं आर.जे.महावशसोबतही जोडलं होतं नाव- (Yuzvendra Chahal And RJ Mahavash)

युझवेंद्र चहल नेहमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यमुळे जास्त चर्चेत असतो. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला होता. धनश्री वर्माशी घटस्फोट घेतल्यानंतर युझवेंद्र चहलचं नाव वारंवार आर.जे.महवशसोबत जोडलं जात होतं.
दोघं एनेकदा एकत्र दिसलेही. मात्र काही दिवसांनंतर दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचं दिसून आलं.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Dhanashree Verma On Yuzvendra Chahal: लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं; युझेवेंद्रबाबत धनश्री वर्माचं खळबळजनक विधान, सगळं बोलून गेली, नेमकं काय घडलं?

Author : मुकेश चव्हाण

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha