Airtel Mobile Recharge Plan | देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेल नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. ग्राहकांच्या गरजेनुसार, त्यांना परवडेल असे रिचार्ज प्लॅन लाँच करण्याकडे कंपनीचा कल असतो.
आताही ज्या ग्राहकांना मोबाईल रिचार्ज वारंवार करावा लागतोय आणि डेटा न वापरता पैसे वाया जात आहेत अशा ग्राहकांसाठी Airtel ने एक खास प्लॅन बाजारात आणला आहे. हा रिचार्ज प्लॅन 469 रुपयांचा असून आजपासून म्हणजे 15 एप्रिलपासून लागू झाला आहे.
या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची असून हा प्लॅन डेटा (Airtel Mobile Recharge Plan) न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खास डिझाइन करण्यात आला आहे. 469 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि बेसिक वापरावर भर देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल तसेच संपूर्ण तीन महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण ९०० एसएमएस मिळतात. मात्र यामध्ये तुम्हाला इंटरनेटची सुविधा मात्र देण्यात आली नाही. ज्यांना इंटरनेटचा वापर करावा लागत नाही त्यांना फक्त कॉलिंग साठी हा रिचार्ज परवडेल.
हे नवीन व्हाउचर विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि सेकंडरी सिम कार्ड वापरकर्त्यांसाठी आहे. या वापरकर्त्यांना अनेकदा फक्त ओटीपी मिळवण्यासाठी किंवा कॉल करण्यासाठी त्यांचे सिम सक्रिय ठेवावे लागते. जरी या मूळ प्लॅनमध्ये डेटाचा (Airtel Mobile Recharge Plan) समावेश नसला तरी, एअरटेल ग्राहकांना लवचिक डेटा बूस्टर देत आहे. जर तुम्हाला कधीकधी इंटरनेट ॲक्सेसची गरज भासल्यास, तुम्ही तुमच्या गरजेनुसार एक छोटा डेटा पॅक जोडू शकता. या हायब्रीड मॉडेलमुळे ग्राहकांना जेवढे इंटरनेट वापरायचे आहे तितक्याच इंटरनेट साठी तुम्ही पैसे देऊ शकता.

