Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
BSNL Recharge Plan : BSNL चा 150 दिवसांचा रिचार्ज प्लॅन; दररोज 2GB इंटरनेट अन बरंच काही

BSNL Recharge Plan : BSNL चा 150 दिवसांचा रिचार्ज प्लॅन; दररोज 2GB इंटरनेट अन बरंच काही

BSNL Recharge Plan | देशी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. एअरटेल, वोडाफोन - आयडिया आणि जिओच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज कमी पैशात उपलब्ध असल्याने मागील काही महिन्यापासून अनेक ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत.

आताही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने परवडणारा रिचार्ज प्लॅन आणला आहे. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन तब्बल १५० दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. म्हणजेच काय तर एकदा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना परत ५ महिने तरी रिचार्ज करण्याचे कसलेही टेन्शन नाही.

आम्ही ज्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलतोय तो आहे बीएसएनएलचा ९९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना रील्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी अधिक डेटा लागतो अशा ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन फायदेशीर आहे. बीएसएनएल इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून या रिचार्ज प्लॅनची माहिती माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, “एक रिचार्ज, १५० दिवसांची अखंड कनेक्टिव्हिटी.” BSNL Recharge Plan

जर तुम्ही जिओ किंवा एअरटेलसारख्या इतर कंपन्यांचा विचार केला, तर त्यांच्या कंपनीच्या दररोज २ जीबी डेटाच्या प्लॅनची ​​किंमत ९७९ आहे, पण त्याची व्हॅलिडिटी फक्त ८४ दिवसांची आहे. तर दुसरीकडे, जिओच्या अशाच एका प्लॅनची ​​किंमत १,०२९ आहे. त्याची व्हॅलिडिटी सुद्धा फक्त ८४ दिवसांची आहे. म्हणजेच काय तर बीएसएनएल याच किमतीत इतर कंपन्यांपेक्षा दुप्पट व्हॅलिडिटीचा लाभ देत आहे. BSNL Recharge Plan

दरम्यान, तुम्हाला जर एका महिन्याचा रिचार्ज प्लॅन हवा असेल तर तुम्ही बीएसएनएलचा २२५ रुपयांचा रिचार्ज करू शकता. या २२५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त, मोफत नॅशनल रोमिंगची सुविधा देखील मिळते. ग्राहकांना दररोज २.५ जीबी हाय-स्पीड डेटा वापरता येतो तसेच दररोज १०० मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनची ​​व्हॅलिडिटी ३० दिवसांची आहे. म्हणजे महिनाभर तुम्ही हा लाभ घेऊ शकता ते सुद्धा फक्त २२५ रुपयांत. इतर कंपन्यांशी तुलना करायचा झालयास तर दिवसाला २.५ जीबी डेटा मिळवण्यासाठी एअरटेल- जिओसारख्या कंपन्या ग्राहकांकडून ३०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रिचार्ज प्लॅन आकारतात. त्यामुळे बीएसएनएल चा हा २२५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन नक्कीच तुम्हाला परवडेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24