Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
BSNL Recharge Plan : BSNL चा 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; रोज 2GB डेटा, अमर्याद कॉलिंगची सुविधा

BSNL Recharge Plan : BSNL चा 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; रोज 2GB डेटा, अमर्याद कॉलिंगची सुविधा

BSNL Recharge Plan | देशी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन आणि आकर्षित रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. मागील वर्षभरात बीएसएनएलने आपल्या नेटवर्कचा संपूर्ण देशात मोठा विस्तार केला आहे.

त्यातच एअरटेल- जिओ सारख्या कंपन्यांपेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज हे तुलनेने खूपच स्वस्त असल्याने ग्राहकांची सुद्धा बीएसएनएलकडे पसंती वाढली आहे. त्यातच आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींच्या दरम्यान BSNL ने नवीन ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे.

कंपनीने 249 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये कमी किमतीत भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळत असल्याने हा प्लॅन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. BSNL Recharge Plan

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 35 दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. रोजचा डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40 Kbps पर्यंत कमी होतो. हा प्लॅन फक्त नवीन BSNL सिम ॲक्टिव्हेट करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. मात्र सिम सुरू झाल्यानंतर पहिल्या रिचार्जच्या स्वरूपातच हा प्लॅन वापरता येतो. एकदा FRC वापरल्यानंतर त्याच नंबरवर पुन्हा हा प्लॅन उपलब्ध होत नाही.

Jio आणि Airtel पेक्षा स्वस्त

इतर टेलिकॉम कंपन्यांसोबत या रिचार्ज प्लॅनची तुलना केली तर Reliance Jio चा दररोज 2GB डेटा देणारा सर्वात स्वस्त प्लॅन 349 रुपयांपासून सुरू होतो, तर Airtel चा हा प्लॅन 379 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही प्लॅन्सची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. BSNL Recharge Plan

BSNL चा हा रिचार्ज प्लॅन नवीन सिम घेणारे ग्राहक, कमी खर्चात जास्त डेटा वापरणारे विद्यार्थी, जास्त कॉलिंग करणारे वापरकर्ते आणि दुय्यम (Secondary) नंबर वापरणारे ग्राहक यांच्यासाठी फायदेशीर आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24