Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
BSNL Recharge Plan : BSNL चा 51 रुपयांचा स्वस्त रिचार्ज!! तब्बल 30 दिवसांची व्हॅलिडिटी

BSNL Recharge Plan : BSNL चा 51 रुपयांचा स्वस्त रिचार्ज!! तब्बल 30 दिवसांची व्हॅलिडिटी

BSNL Recharge Plan | सरकारी दूरसंचार कंपनी BSNL नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन आणत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज हे परवडणारे आणि तुलनेने कमी पैशात उपलब्ध असल्याने मागील काही दिवसांत बहुतांश ग्राहकांनी बीएसएनएल मध्ये प्रवेश केलाय.

आता आपल्या ग्राहकांना आणखी आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर केला आहे. हा प्लॅन वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह इतर अनेक फायदे देतो.

या ऑफर अंतर्गत बीएसएनएल ग्राहकांना फक्त ५१ रुपयांत ३० दिवसांची व्हॅलिडिटी असणारा रिचार्ज प्लॅन करता येणार आहे. बीएसएनएलने आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे या नवीन रिचार्ज प्लॅनची ​​घोषणा केली. ५१ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि २८ दिवसांसाठी मोफत नॅशनल रोमिंगला लाभ मिळतो. तसेच या प्लॅनसोबत वापरकर्त्यांना एक नवीन सिम कार्ड पूर्णपणे मोफत मिळेल.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अवघ्या ५१ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा आणि १०० मोफत एसएमएस मिळतात. मात्र हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन २२ मे ते ३० जून २०२६ पर्यंत वैध आहे. आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन बीएसएनएलने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, कंपनीने गेल्या वर्षी आपल्या ‘फ्रीडम ऑफर’चा भाग म्हणून १ रुपयांचा प्लॅन सादर केला होता. BSNL Recharge Plan

BSNL चा २५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

दरम्यान, BSNL ने काही दिवसापूर्वीच आपला २५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा मिळते. महत्वाची गोष्ट म्हणजे हा रिचार्ज प्लॅन 30 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. कमी बजेटमध्ये जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन फायदेशीर मानला जात आहे. BSNL Recharge Plan

सामान्यतः बहुतेक टेलिकॉम कंपन्या 28 दिवसांचे प्लॅन देतात, ज्यामुळे ग्राहकांना वर्षभरात एक अतिरिक्त रिचार्ज करावा लागतो. मात्र, BSNL च्या या प्लॅनमध्ये महिनाभर व्हॅलिडिटी मिळत असल्याने वार्षिक खर्च काही प्रमाणात कमी होऊ शकतो. याचा दिवसाला खर्च सुमारे 8.5 रुपये इतका पडतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हा रिचार्ज प्लॅन नक्कीच परवडेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24