BSNL Recharge Plans | एअरटेल, जिओ, वोडाफोन- आयडिया यांच्यासारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्या आपल्या तिच्या किमतीत भरमसाथ वाढ करत असल्याने अनेक ग्राहक देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडे वळत आहेत.
बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन हे तुलनेने स्वस्त आणि कमी पैशात जास्त फायदेशीर असल्याने बीएसएनएलचा ग्राहक वर्गही मागील काही महिन्यात प्रचंड वाढला. मात्र ग्राहकांची संख्या वाढताच बीएसएनएल ने सुद्धा एअरटेल, जिओ सारखंच पाऊल टाकलं आहे. किंमत कमी करण्यापेक्षा आधीच्या रिचार्जमधील फायदे कमी करण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतलाय. या निर्णयामुळे ग्राहकांची घोर निराशा झाली असून नाराजीचा सूर उमटला जातोय.
टेलीटॉमटॉकच्या अहवालानुसार, बीएसएनएलने पुन्हा एकदा आपल्या १०७ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली आहे. पूर्वी, या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ३५ दिवसांची होती. त्यानंतर ती २२ दिवसांची करण्यात आली आणि आता तर ती फक्त २० दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. म्हणजेच काय तर १०७ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी जवळपास निम्म्याने कमी झाली आहे. या प्लॅनमध्ये २०० मिनिटांचे व्हॉईस कॉलिंग आणि ३ जीबी डेटासारखे फायदे मिळतात. मात्र या प्लॅनची खास गोष्ट होती ती म्हणजे व्हॅलिडिटी. जास्त वैधता असल्यानेच ग्राहक मोठ्या प्रमाणावर हा प्लॅन वापरत होते. मात्र आता या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी अवघी २० दिवसांची करण्यात आल्याने ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. BSNL Recharge Plans
फक्त १०७ रुपयांचाच नव्हे तर बीएसएनएलने आपल्या लोकप्रिय १९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये एक बदल केला या प्लॅनची वैधता ४२ दिवसांवरून केवळ ३५ दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. मात्र, कंपनीने यामध्ये मिळणारा डेटा ४ जीबीवरून ५ जीबीपर्यंत वाढवला आहे. वापरकर्त्यांना दररोज ३०० मिनिटांचे मोफत कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळणे पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. म्हणजेच काय तर कंपनीने एकीकडे इंटरनेट डेटा मध्ये किरकोळ वाढ केली आहे, तर दुसरीकडे व्हॅलिडिटी मात्र तब्बल ७ दिवसांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांचा रिचार्ज प्लॅन लवकरच संपेल आणि त्यांना ७ दिवस आधीच रिचार्ज करावा लागेल. BSNL Recharge Plans
जिओ आणि एअरटेलने अलीकडेच त्यांच्या प्लॅन्समध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळेअनेक ग्राहक स्वस्त पर्यायासाठी BSNL कडे वळत होते. मात्र, BSNL ने दर न वाढवता थेट ‘व्हॅलिडिटी’ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहक नाराज झाले आहेत. व्हॅलिडिटी कमी झाल्याने ग्राहकांचा खर्च हा वाढणारच आहे.

