Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CNG Price Hike : CNG पुन्हा महागला!! आता तब्बल इतक्या रुपयांनी भाव वाढले

CNG Price Hike : CNG पुन्हा महागला!! आता तब्बल इतक्या रुपयांनी भाव वाढले

CNG Price Hike | इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. युध्दाचा परिणाम म्हणजे देशात मागील एकही दिवसापासून महागाईचा अक्षरशः भडका उडालेला आहे. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

आज कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’च्या (CNG) किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ने (MNGL) जाहीर केलेल्या दरसुधारणेनुसार, पुणे आणि लगतच्या परिसरातील CNG च्या दरात बुधवार, २७ मे २०२६ च्या मध्यरात्रीपासून २.५० रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.

या दरवाढीमुळे आता पुण्यात प्रतिकिलो सीएनजीचा दर 94.85 रुपये इतका झाला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडीलगतच्या परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर सीएनजीचे हे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा धक्का बसला आहे. गाडी चालवणं आणि प्रवास करणे आता आधीपेक्षा आणखी महाग झालं आहे.

MNGL च्या माहितीनुसार, CNG क्षेत्रासाठी पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) ‘इनपुट कॉस्ट’मध्ये झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ करणे आवश्यक ठरले आहे. CNG क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे, CNG च्या किरकोळ विक्री दरात २.५० रुपये प्रति किलोने वाढ करणे आवश्यक झाले आहे. CNG च्या किमती महाग झाल्या असल्या तरी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत CNG च्या माध्यमातूनच पैशाची लक्षणीय बचत होतेय हे सांगायला सुद्धा अधिकारी विसरले नाहीत. CNG Price Hike

सुधारित दरानुसार, पुण्यात सध्याच्या इंधन दरांच्या तुलनेत, CNG मुळे पेट्रोलवर चालणाऱ्या प्रवासी गाड्यांच्या तुलनेत सुमारे ४८% आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत सुमारे २६% बचत होण्याचा अंदाज आहे. घरगुती ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती वापराच्या ‘पाईप्ड नॅचरल गॅस’च्या (PNG) दरात कोणताही बदल होणार नाही, असे MNGL ने स्पष्ट केले आहे.

CNG चे भाव वाढले असले तरी तरी घरगुती PNG चे दर मात्र कायम ठेवण्यात आले आहेत. आमच्या सर्व ग्राहकांनी CNG च्या या सुधारित दरांची नोंद घ्यावी, हे नवीन दर २७-२८ मे २०२६ च्या मध्यरात्रीपासून अंमलात येतील,” असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24