Dailyhunt
Gas Cylinder : या लोकांना दुप्पट मिळणार गॅस सिलेंडर; सरकारचा मोठा निर्णय

Gas Cylinder : या लोकांना दुप्पट मिळणार गॅस सिलेंडर; सरकारचा मोठा निर्णय

Gas Cylinder : इराण आणि इस्राईल यांच्यात मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे भारताच्या गॅस आणि ऊर्जा आयातीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. देशात गॅस सिलेंडरचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून गॅस सिलेंडरच्या वितरणात आणि बुकिंगमध्ये बदल करण्यात आले आहेत.

आजही अनेक हॉटेल चालकांना एलपीजी गॅस सिलेंडर विकत घेणं कठीण झालं आहे तसेच घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा वेळेवर मिळेना झालाय. यादरम्यान आता केंद्र सरकारने एक महत्वाचं पाऊल उचलत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वाटप करण्यात येणाऱ्या ५-किलो एलपीजी सिलेंडरची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थलांतरित कामगार आणि समाजातील दुर्बळ घटकांना इंधनाच्या तुटवड्यापासून वाचवण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय. ५-किलोचे सिलेंडर (Gas Cylinder) विशेषतः अशा कामगारांसाठी राखीव असतील ज्यांच्याकडे कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे ५-किलोचे सिलेंडर केवळ ओळखपत्र दाखवून सहज खरेदी करता येतील. नियमित घरगुती गॅस कनेक्शनसाठी ग्राहकांना पत्त्याचा पुरावा द्यावा लागत असल्याने, स्थलांतरितांसाठी हे एक आव्हान ठरते. अनेकदा हा गॅस सिलेंडर मिळवणे म्हणजे मोठी डोकेदुखी ठरते. अशावेळी या नागरिकांना मजबुरी म्हणून काळाबाजार करणाऱ्यांकडून जास्त किमतीत स्वयंपाकाचा गॅस खरेदी करावा लागतो. साहजिकच यासाठी त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात आणि नाहक मनस्ताप होतो तो वेगळाच.

मात्र आता केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून गॅस सिलिंडरचे (Gas Cylinder) दैनंदिन वाटप दुप्पट करण्याचे आदेश दिले आहेत. हे ५ किलोचे एफटीएल सिलिंडर राज्य सरकारांना आणि त्यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांना पुरवले जातील. याचे वाटप फक्त तेल विपणन कंपन्यांमार्फत स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना केले जाईल. हे अतिरिक्त वाटप २१ मार्च रोजी निश्चित केलेल्या विद्यमान २० टक्के मर्यादेव्यतिरिक्त असेल. ५-किलोचा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एलपीजी वितरकाकडे जावे लागेल, जिथे तुम्ही फक्त एक वैध ओळखपत्र सादर करून ते खरेदी करू शकता. मात्र या गॅस सिलेंडरचा वापर फक्त घरातच करावा. व्यावसायिक वापरास सक्त मनाई आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्थलांतरित कामगार आणि समाजातील दुर्बळ घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आता गॅस सिलेंडरचा कसलाही तुटवडा जाणवणार नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24