Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही आपल्या ट्रेनच्या प्रवासात सुटण्याच्या अगदी आधीही बदल करू शकता. भारतीय रेल्वेने १ एप्रिल २०२६ पासून बोर्डिंग पॉईंट बदलण्याचे नियम सोपे केले आहेत.
याचा लाखो प्रवाशांना थेट फायदा होणार आहे, आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
पूर्वी, बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी प्रवाश्यांना किमान २४ तास आधीची आवश्यकता होती. यामुळे अनेकदा अचानक बदललेल्या योजना रद्द करणे किंवा स्टेशन बदलणे कठीण जात असे. आता मात्र हा नियम बदलला आहे. तुम्ही फक्त ३० मिनिटे आधी सुद्धा तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. अचानक प्रवास रद्द करायचा ठरवल्यास किंवा तुमच्या सोयीसाठी स्टेशन बदलायचा असल्यास आता ते सहज शक्य आहे. यामुळे प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Indian Railways
या सुविधेमुळे प्रवाशांना शेवटच्या क्षणी दुसऱ्या स्टेशनवरून गाडी पकडणे शक्य होईल. आतापर्यंत, ही सुविधा केवळ चार्ट तयार होईपर्यंतच उपलब्ध होती. आता, प्रवाशांना ऐनवेळी प्रवासाची योजना बदलल्यास आपली जागा गमावण्याची चिंता करावी लागणार नाही, त्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
बदल केलेले बोर्डिंग पॉईंट सेकंड आरक्षण चार्ट मध्ये अपडेट केले जाईल. म्हणजेच, ट्रेन सुटण्याच्या अगदी आधीही तुम्ही बदल करू शकता. अचानकवेळी समजा तुमचा प्लॅन बदलला, अचानक ट्रॅफिक लागले तर अशा प्रवाशांना या नवीन नियम बदलाचा फायदा होईल. ही सुविधा केवळ कन्फर्म आणि RAC तिकिटांवर लागू आहे. वेटिंग तिकिटावर हा नियम लागू नाही. तसेच हा बदल सेकंड चार्ट तयार होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. Indian Railways
यासह, रेल्वेने तिकीट रद्द करण्याचे नियम देखील अपडेट केले आहेत. नवीन नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या कमीत कमी ८ तास आधी कन्फर्म तिकीट रद्द केल्यासच परतावा (रिफंड) मिळेल. यापूर्वी ही वेळमर्यादा ४ तास होती. परंतु आता विलंब झाल्यास अनामत रक्कम गमवावी लागू शकते. या बदलामुळे ऐनवेळी होणारी धावपळ कमी होईल आणि रिकाम्या जागा गरजू प्रवाशांना वेळेवर देता येतील असा विश्वास रेल्वे विभागाला आहे

