Dailyhunt
Jalna-Nanded Highway : मराठवाड्यातील 'या' महामार्गाच्या प्रकल्पाला वेग येणार; थेट समृद्धीला जोडला जाणार

Jalna-Nanded Highway : मराठवाड्यातील 'या' महामार्गाच्या प्रकल्पाला वेग येणार; थेट समृद्धीला जोडला जाणार

Jalna-Nanded Highway | मागील काही वर्षात महाराष्ट्रात रस्त्यांची कामे जोरात सुरु आहेत. ठिकठिकाणी नवनवीन महामार्ग, उड्डाणपूल यांची उभारणी करण्याचे काम सुरु आहे. रस्ते मजबूत होत असल्याने राज्यातील वाहतूक आणि दळणवळणाला सुद्धा चांगली गती आली आहे.

आता महाराष्ट्रातील आणखी एका मार्गाच्या कामाला वेग येणार आहे. होय, मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे. या महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया येणाऱ्या सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

जालना-नांदेड द्रुतगती महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या परभणी जिल्ह्यातील भूसंपादनाच्या प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डिकर यांच्यासह महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंधारण विभागांमधील वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा ‘पॅकेज-निहाय’ आढावा घेतला आणि ज्या ठिकाणी अजूनही काम रखडलं आहे त्याठिकाणी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. Jalna-Nanded Highway

परभणी जिल्ह्यातील ‘पॅकेज ५’ साठी भूसंपादनाचे आदेश यापूर्वीच जारी करण्यात आले आहेत; मात्र, आवश्यक जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना सांगितले. मात्र परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करा आणि त्यांना विश्वासात घेऊन तातडीने पुढील कार्यवाही करा अशा सूचना बावनकुळे यांच्याकडून देण्यात आल्या. Jalna-Nanded Highway

सध्याच्या भूसंपादना स्थितीबाबत जाणून घ्यायचं झाल्यास, परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एकूण २५६.४२ हेक्टर क्षेत्र संपादनापैकी १६७.४६ हेक्टरचा ताबा मिळाला आहे. तर जिंतूर तालुक्यातील एकूण ६९.८२ हेक्टर पैकी ६०.०२ हेक्टर क्षेत्राचा ताबा पूर्ण झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24