LPG Gas Agency | इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असून देशात LPG गॅस बुकिंगबाबत सरकारकडून नवनवीन नियम जारी करण्यात आलेत. अनेक ठिकाणी वेळेवर गॅस मिळत नसल्याने जनता अक्षरशः हतबल झाली आहे.
आपला माणूस गॅस एजन्सी मध्ये असता तर बरं झाले असत असे अनेकांना वाटत आहे. काहींना तर असं वाटत कि आपलीच स्वतःची गॅस एजन्सी असती तर खूप फायदा झाला असत. अशावेळी गॅस एजन्सी नेमकी कशी सुरु करायची? त्यासाठी प्रक्रिया काय असते याबाबत सविस्तर माहिती समजून घेऊया.
एलपीजी गॅस एजन्सी (LPG Gas Agency) सुरू करण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण आजच्या काळात जवळपास प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस वापरला जातो. शहर असो किंवा गाव असो, गॅसची मागणी कधीही कमी होत नाही. त्यामुळे हा व्यवसाय कायम चालणारा आणि स्थिर उत्पन्न देणारा मानला जातो. ग्राहक सतत मिळत राहतात. इतर व्यवसायांप्रमाणे यात जास्त चढ-उतार नसतात. दीर्घकालीन स्थिरतेसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी सुरुवातीला चांगली गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी साधारणपणे 15 लाख ते 30 लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो.या खर्चामध्ये, जागा, गोदाम, ऑफिस सेटअप, वाहन व्यवस्था आणि रोजच्या कामासाठी लागणारा निधी यांचा समावेश होतो. LPG Gas Agency
कोण अर्ज करू शकतो?
एलपीजी एजन्सीसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी आहेत:
अर्जदार भारतीय नागरिक असावा
वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे
किमान 10 वी पास असणे आवश्यक
स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली योग्य जागा असावी
कुटुंबातील कोणीही तेल कंपनीत नोकरीत नसावे
अर्ज कसा करायचा?
गॅस एजन्सी कधीही थेट मिळत नाही.
सरकारी तेल कंपन्या वेळोवेळी जाहिरात काढतात.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर फॉर्म भरावा लागतो
सुमारे 10,000 रुपये फी भरावी लागते
यानंतर पात्र उमेदवारांची लॉटरी पद्धतीने निवड होते.
निवड झाल्यावर कागदपत्रे आणि जागेची तपासणी केली जाते. LPG Gas Agency
भारतामध्ये मुख्यतः इंडेन (Indian Oil), भारत गॅस (Bharat Petroleum), एचपी गॅस (Hindustan Petroleum) सारख्या कंपन्या एलपीजी चे डिस्ट्रिब्युशन देतात. या व्यवसायात तुम्हाला प्रत्येक गॅस सिलिंडरवर कमिशन मिळते. प्रत्येक सिलेंडरमागे साधारणपणे 40 ते 60 रुपयांचे कमिशन मिळू शकते. जर तुमच्याकडे 5,000 ते 10,000 ग्राहक असतील, तर महिन्याला 1.5 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. याशिवाय नवीन कनेक्शन, सर्व्हिसिंग आणि इतर सेवा यातूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते.

