Marathwada Trains | महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने पूर्णा-जालना-नांदेड या महत्त्वाच्या मार्गावर नवीन दैनंदिन प्रवासी रेल्वेगाडी सुरू केली आहे.
या नव्या रेल्वेगाडी मुळे मराठवाडा भागातील रेल्वे संपर्क मजबूत होईल.
ही नवीन रेल्वेगाडी दोन टप्प्यांत चालवली जाणार आहे. यातील गाडी क्रमांक ७७६२३ ही पूर्ण ते जालना दरम्यान धावणार , तर गाडी क्रमांक ७७६२४ ही जालना ते नांदेड दरम्यान प्रवास करेल. पूर्णा-जालना ही सेवा ४ मे २०२६ पासून सुरू झाली असून, जालना-नांदेड ही सेवा ५ मे २०२६ पासून प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. या दोन टप्प्यांमुळे संपूर्ण मार्गावर सलग आणि नियमित रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. Marathwada Trains
या रेल्वे सेवेमुळे परभणी , जालना, नांदेड आणि पूर्णा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. खास करून नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही ट्रेन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यंत बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना आता या नवीन रेल्वेमुळं स्वस्तात आणि आरामात प्रवास करता येणार आहे.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या रेल्वेगाडीचा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, ती अनेक लहान-मोठ्या स्थानकांवर थांबणार आहे. यात नांदेड, वणेगाव, लिंबगाव, चुडावा, पूर्णा जंक्शन, मिरखल, पिंगळी, परभणी जंक्शन, पेरगाव, देवलगाव अवचार, मानवत रोड, धेंगली पिंपळगाव, सेलू, सातूना, उस्मानपूर, परतूर, पारदगाव, रांजणी, कोडी, सरवारी आणि जालना या स्थानकांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी गाडी थांबणार असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. Marathwada Trains
बस किंवा खासगी वाहनांच्या तुलनेत रेल्वे प्रवास स्वस्त असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावरचा भार कमी होईल. तसेच, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणालाही फायदा होईल.
रेल्वे प्रशासनाच्या मते, ही सेवा नियमित आणि वेळेवर चालवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच भविष्यात या मार्गावर अधिक गाड्या सुरू करण्याचाही विचार केला जाऊ शकतो, असे संकेतही मिळत आहेत.

