Mumbai Nagpur Railway Update : मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने या मार्गावरील एक महत्त्वाची वेगमर्यादा हटवली आहे.
त्यामुळे आता या मार्गावर धावणाऱ्या गाड्या पूर्वीपेक्षा अधिक वेगाने धावू शकणार आहेत. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार असून, प्रवासाचा वेळही कमी होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाने गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी आणि सुरक्षितता मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आसवली ते पाडली या दरम्यानचे काम पूर्ण करण्यात आले आहे.या भागात पूर्वी सुमारे ८०० मीटर अंतरावर वेगमर्यादा लागू होती. त्यामुळे गाड्यांचा वेग कमी करावा लागत होता आणि प्रवासाला जास्त वेळ लागत होता. मात्र आता हे बंधन पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, हा भाग थोडा अवघड भूभागात येतो. उंची, वळणदार ट्रॅक आणि मर्यादित पोहोच या सगळ्या अडचणींवर मात करत रेल्वेने हे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. यामुळे आता मुंबई-नागपूर मार्गावरील प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. Mumbai Nagpur Railway Update
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले की, आसवली-पाडली विभाग हा भुसावळ विभागाचा एक भाग असून तो मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर येतो. “ही वेगमर्यादा जवळपास ८०० मीटरच्या पट्ट्यापुरती मर्यादित होती आणि त्याचा परिणाम गाड्यांच्या एकूण प्रवासाच्या वेळेवर होत असे. विभागीय रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, १६०.५७ ते १६०.१३ किलोमीटरच्या टप्प्यादरम्यान बऱ्याच काळापासून ७५ किमी प्रति तास (kmph) ची ‘कायमस्वरूपी वेगमर्यादा’ (PSR) लागू होती.
या मर्यादेमुळे, विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत, या भागावर सतत देखरेख ठेवणे आवश्यक ठरत असे. हे काम पार पाडताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, कारण हा विभाग ‘निम-घाट क्षेत्रात स्थित असून थोडा अवघड भूभागात येतो. उंची, वळणदार ट्रॅक आणि मर्यादित पोहोच या सगळ्या अडचणींवर मात करत रेल्वेने हे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. Mumbai Nagpur Railway Update
रेल्वे रुळांच्या ‘फॉर्मेशन’ची (पायाची) उंची अंदाजे ९ मीटर आहे आणि या टप्प्यावर २.२६ अंशांचा एक वळणदार भाग (curve) देखील आहे. या सर्व मर्यादांचा विचार करून, हे काम धोरणात्मकदृष्ट्या २०२५ च्या पावसाळ्यानंतर हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले होते,” असे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांचाही मोठा प्लॅन आखला आहे. चालू आर्थिक वर्षात हजारो विशेष फेऱ्या चालवल्या गेल्या आहेत. याशिवाय, एप्रिल ते जुलै दरम्यान उन्हाळी विशेष गाड्याही मोठ्या प्रमाणावर चालवल्या जाणार आहेत, ज्यापैकी बहुतेक गाड्या महाराष्ट्रासाठी असतील. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

