Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Special Flights For IPL 2026 Final : IPL फायनल निमित्त मुंबई- बंगळुरूहुन अहमदाबादसाठी विशेष विमानसेवा सुरु

Special Flights For IPL 2026 Final : IPL फायनल निमित्त मुंबई- बंगळुरूहुन अहमदाबादसाठी विशेष विमानसेवा सुरु

Special Flights For IPL 2026 Final | उद्या ३१ मे २०२६ रोजी इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना होणार आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारतात क्रिकेट हा फक्त एक खेळ नव्हे तर जणू त्याला धर्मासारखं मानले जाते. कोणताही क्रिकेटचा सामना असल्यास स्टेडियममध्ये क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी बघायला मिळते. उद्या तर अहमदाबाद येथे चक्क आयपीएल फायनल असल्याने मोठ्या संख्यने क्रिकेट चाहते मैदानावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

फक्त गुजरात मधूनच नव्हे तर बंगळुरू वरून सुद्धा आपल्या लाडक्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटप्रेमी अहमदाबाद येथे दाखल होऊ लागले आहेत. अशावेळी क्रिकेटप्रेमींना आरामात अहमदाबादला पोहचता यावे तसेच त्यांना कमी कालावधीत स्टेडियमवर जाते यावे यासाठी आता Akasa Air या विमान वाहतूक कंपनीने मुंबई आणि बंगळुरू येथून विशेष विमान सेवा सुरू केली आहे. Special Flights For IPL 2026 Final

या नियोजित विमान सेवांमुळे चाहत्यांना सामन्याच्या वेळेपूर्वी अहमदाबादला पोहोचणे, अंतिम सामना डोळ्यादेखत पाहणे आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच आपल्या मूळ शहरांमध्ये परत येणे शक्य होईल. मॅच च्या दिवशीच विमानसेवा असल्याने क्रिकेट प्रेमींना आदल्या रात्री अहमदाबादमध्ये मुक्काम करण्याची गरज उरणार नाही आणि त्यांच्या हॉटेल भाडे किंवा इतर खर्चाची बचत होऊ शकते.

Akasa Air ने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने म्हंटल कि, मुंबई, बंगळुरू आणि अहमदाबाद दरम्यान सामन्याच्या दिवशी विशेष विमाने! या मोठ्या सामन्यासाठी वेळेच्या आधीच अहमदाबादमध्ये दाखल व्हा. अंतिम सामन्याचा तो थरार प्रत्यक्ष अनुभवा. सामना संपताच लगेच मुंबई किंवा बंगळुरू येथील आपल्या घरी परता आणि रात्रीच्या मुक्कामाची चिंता सोडा.

या दोन्ही विमानांच्या वेळापत्रकाबाबत सांगायचं झाल्यास, बंगळुरू-अहमदाबाद विमान ३१ मे रोजी सकाळी ९.३० वाजता बंगळुरू येथून निघेल आणि सकाळी ११.५० वाजता अहमदाबादला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात हे विमान १ जून रोजी पहाटे ४.१० वाजता अहमदाबादहून निघेल आणि सकाळी ६.३५ वाजता बंगळुरूमध्ये दाखल होईल. Special Flights For IPL 2026 Final

तर दुसरीकडे, मुंबई-अहमदाबाद विमान ३१ मे रोजी दुपारी २.४५ वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करेल आणि दुपारी ४.१५ वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात विमान १ जून रोजी पहाटे ३.१० वाजता अहमदाबादहून निघेल आणि पहाटे ४.४५ वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24