menu
अक्षरनामाराज्यकारण

'वंचित बहुजन आघाडी'चे राजकीय यश भलेही मर्यादित असेल, पण ती उद्याच्या महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलू शकते!

11 February 2019, 11:31 am

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या १७ व्या लोकसभेसाठी 'वंचित बहुजन आघाडी'च्या माध्यमातून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या दोन प्रस्थापित आघाड्यांना पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडी खा. असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमसोबत केली आहे. २०१४ ला देशात व राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर देशात उजव्या शक्तीचा प्रभाव वाढत गेला. गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या प्रकारे उजवी विचारधारा बळकट होत गेली. या काळात या सरकारने एका बाजूला भारताचा आर्थिक विकास, भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा संवर्धन व डिजिटल भारत अशी प्रतिमा निर्माण केली, तर दुसऱ्या बाजूला उजव्या विचाराची प्रचंड ताकद उभी करून अनेक क्षेत्रांत प्रस्थापित गांधीवादी, मार्क्सवादी, धर्मनिरपेक्षतावादी विचारांचे खच्चीकरण केले.

Loading...

No Internet connection

Link Copied