Friday, 13 Dec, 12.00 am अक्षरनामा

नवे लेख
पुस्तक-वेड्यांचे दोन प्रकार पाहण्यासारखे!

'फिल्टर कॉपी' या नावाचं एक लोकप्रिय यूृट्युब चॅनेल आहे. पूर्णपणे तरुण वाचकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून हे चॅनेल चालवलं जातं. यावर रोज स्केचेस, गंमतीशीर व्हिडिओज, लेख, मीम्स, एकेक भागांचे वेगवेगळ्या विषयावरील एपिसोड, असं खूप काही पाहायला मिळतं. कामाचा कंटाळा आला असेल किंवा काही तरी चांगलं पाहायचं असेल किंवा आपल्या हाताशी असलेली पाच-दहा मिनिटं सत्कारणी लावायची असतील, अशा वेळी तुम्ही 'फिल्टर कॉपी'वरील एखादा एपिसोड पाहू शकता. तुम्हाला फ्रेश वाटेल, तुमचा कंटाळा दूर होईल.

दर आठवड्याला काही लाख लोक 'फिल्टर कॉपी' हा चॅनेल त्यासाठीच तर पाहतात आणि महिन्याला काही कोटी. दर दिवशी हे चॅनेल पाहणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे.

या चॅनेलवरील 'पुस्तक-वेड्यां'विषयीचे हे दोन एपिसोड.

पहिला एपिसोड - When You Date A Book Lover.

याला आत्तापर्यंत किती व्ह्यूज मिळाले असतील. काही कल्पना, अंदाज?

ती संख्या आहे, ५ कोटी, ७७ लाख, १ हजार एकशे सव्वीस

तर हा पहिला एपिसोड.

दुसरा एपिसोड - Every Book Lover Ever.

या एपिसोडमध्ये साक्षात प्रसिद्ध लेखक अमिष याने काम केलं आहे.

याला आत्तापर्यंत किती व्ह्यूज मिळाले असतील. काही कल्पना, अंदाज?

ती संख्या आहे, ३ लाख, ४५ हजार सहाशे पंचाहत्तर.

तर हा दुसरा एपिसोड.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aksharnama
Top