Monday, 07 Oct, 8.30 am AM News

स्पोर्ट्स
आयसीसी क्रमवारीत रोहितची मोठी झेप, आश्विन टॉप 10 मध्ये

स्पोर्ट डेस्क । सलामीवीर म्हणून पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या रोहित शर्माने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत जबरदस्त झेप घेतली आहे. फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत हिटमन रोहित शर्मा कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 176 तर दुसऱ्या डावात 127 धावा केल्या होत्या. रोहितची 'सामनावीर' म्हणूनही निवड झाली.

रोहितने आतापर्यंत खेळलेल्या 28 कसोटी सामन्यात पाच शतके झळकावली आहेत. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात दुहेरी शतक झळकावल्यानंतर इतर सलामीवीर मयंक अग्रवालने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 25 वे स्थान मिळवले.

कर्णधार विराट कोहलीने दुसरे स्थान कायम राखले आहे, जानेवारी 2018 नंतर तो प्रथमच 900 च्या खाली घसरला आहे. त्याच्याकडे आता 899 गुण असून ऑस्ट्रेलियाच्या अव्वल स्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या 38 गुण मागे आहे.

रविचंद्रन अश्विन टॉप 10 मध्ये
गोलंदाजांपैकी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन सामन्यात आठ विकेट घेत पहिल्या दहामध्ये परतला. पहिल्या डावात त्याने 145 धावा देऊन सात गडी बाद केले. अश्विनने 14 व्या स्थानावरुन चार स्थानांची झेप घेतली आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top