Tuesday, 11 Feb, 3.30 pm AM News

स्पोर्ट्स
बदला पूर्ण ! न्यूझीलंडने दिला भारताला व्हाईट वॉश, मालिका 3-0 ने जिंकली

स्पोर्ट्स डेस्क । न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भाराताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही गमावली आहे. न्यूझीलंडने भारताचा 3-0 असा धुव्वा उडवला. माऊंट मौनगुनी येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात किवींनी टीम इंडियाचा 5 गडी राखून पराभव केला. टी -२० मालिकेतील 5-0 च्या पराभवाचा बदला म्हणून न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताच्या 3-0 ने विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीनंतर टीम इंडियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 296 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य दिले.

केएल राहुलने भारतासाठी 112 धावांची खेळी केली. त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 47.1 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडने 4 विकेट्सने जिंकला होता. यानंतर दुसर्‍या एकदिवसीय सामन्यातही किवी संघाने भारताला धुळ चारून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडनेही अखेरचा सामना जिंकून टीम इंडियाचा व्हाईट वॉश केला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top