Sunday, 19 Jan, 6.30 pm AM News

चालू घडामोडी
भाजपा खासदाराने अमित शहांची तुलना केली थेट सरदार पटेलांशी, राष्ट्रवादीचा आक्षेप

मुंबई । आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून राज्यात सुरू झालेला गोधळ थांबायचं नाव घेत नसताना भाजपा खासदार तेजस्वी सुर्या याने गृहमंत्री अमित शहा यांची तुलना थेट सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या लेखकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना चक्क छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यानंतर, महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि शिवभक्तांकडून लेखक गोयल यांचा निषेध नोंदविण्यात आला होता. आता, भाजपाच्या एका खासदाराने अमित शहांची तुलना चक्क सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली आहे.

भाजपाखासदार तेजस्वी सूर्या यांनी गृहमंत्री अमित शहांना एक पेटींग फोटो भेट दिला आहे. त्यामध्ये, सरदार वल्लभभाई पटेल यांचा आणि अमित शहांचा अर्धा-अर्धा फोटो दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. ''युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्याच्या कुटील कारस्थानानंतर आता भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी अमित शहा यांची तुलना करण्याचे धाडस केवळ अंधभक्तच नाही तर भाजपाच्या अनुयायी खासदारांकडूनही होत आहे'', असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.




IND Vs AUS | भारताची चांगली सुरूवात, मालिका विजयासाठी 287 धावांचे लक्ष


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top