Tuesday, 11 Aug, 12.10 pm AM News

मुख्यपृष्ठ
बीडमध्ये गेल्या 24 तासात 230 कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 2 हजार 44 वर

बीड । बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या आकड्याला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या देखील करण्यात येत आहे. तर व्यापाऱ्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून या टेस्टमधून अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 230 रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजारांच्या पार गेला आहे.

बीड जिल्हयातून गेल्या 24 तासात 3816 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये 3575 नमुने निगेटिव्ह आले असून, तब्बल 230 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात बीड शहरात सर्वाधिक 163 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2044 वर गेला आहे. तर 714 जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या 1285 जणांवर उपचार सुरू आहे. तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top