Wednesday, 23 Sep, 11.30 am AM News

चालू घडामोडी
Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 358 कोरोनाबाधितांचा भर; तर 7 जणांचा मृत्यू

औरंगाबाद । औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आज पुन्हा जिल्ह्यात 358 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 31 हजार 443 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 6 हजार 51 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 886 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत सुमारे 24 हजार 506 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 63, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 72 आणि ग्रामीण भागात 57 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (135)

वडजी वैजापूर (1), पिंप्री राजा (1), देवगाव रंगारी, कन्नड (2),अन्य (1),नगर पंचायत, फुलंब्री (1), डावरवाडी (6), चांगतपुरी, पैठण (3), गणेश नगर पिंपळवाडी (1), एमआयडीसी, पैठण (2) बालानगर (3),यशवंत नगर, पैठण (1), धनगरवाडा,पैठण (1), संतनगर, पैठण (1), आपेगाव पैठण (1), सोयगाव,पैठण (1), नानेगाव, पैठण (1), जामगाव, गंगापूर (3), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), इंद्रनील कॉलनी, वैजापूर (1), परदेशी गल्ली, वैजापूर (1), गोयगाव, वैजापूर (1), जुनी भाजी मंडई, वैजापूर(1), विनायक कॉलनी, वैजापूर (2), जीवनगंगा, वैजापूर (1), चंद्रपाल नगर, वैजापूर (1), जरुर फाटा, वैजापूर (3), शिवूर, वैजापूर (1), रेणूका वैजापूर (2),सावडगाव, वैजापूर (4), विनायक कॉलनी, वैजापूर (1), औरंगाबाद (23), गंगापूर (9), कन्नड (4), सिल्लोड (7), वैजापूर (14), पैठण (1), पानवडोद, सिल्लोड (3), विद्या नगर, कॉलेज रोड, कन्नड (1), भोळेश्वर कॉलनी, कन्नड (1), शिवाजी नगर, वडगाव (1), दीप नगर, पंढरपूर (2), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), मायबोली सो., बजाज नगर (1), देवगिरी नगर, बजाज नगर (1), बजाज नगर (2), ठाकरे चौक, बजाज नगर (1), अक्षयतृतीया सो., बजाज नगर (1), देवगिरी सो., बजाज नगर (1), रामराई, वाळूज (1), हनुमान नगर, वाळूज (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), श्रीकृष्ण नगर, सिल्लोड (1), उंडणगाव, सिल्लोड (1), भवन, सिल्लोड (1), आमठाण, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड (2), शिक्षक कॉलनी, सिल्लोड (1)

मनपा (88)

देवगिरी व्हॅली (1), कैलास नगर (1), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (1), जयभवानी नगर (4), एन नऊ हडको (1),टाईम्स कॉलनी (1), एन अकरा गजानन नगर (1), टीव्ही सेंटर (1), नारळीबाग (1), जयसिंगपूरा (1), जटवाडा रोड (1), छत्रपती नगर, हर्सूल (1), शिवनेरी कॉलनी (1), मयूर पार्क (2), नवजीवन कॉलनी (3), समर्थ नगर (1),एन एक सिडको (1), अन्य (4), संत ज्ञानेश्वर नगर (1), एन बारा (2), मिलन नगर (1), म्हाडा कॉलनी (2), विद्या नगर (1), म्हाडा कॉलनी ,देवळाई परिसर (2),कमलनयन बजाज वसतीगृह परिसर (1), श्रीकृष्ण नगर (1), देशमुख नगर (2), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), नूतन कॉलनी (2), मेहेर नगर (2), सावरकर कॉलनी (1),त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (1), गांधी नगर (3), टी पॉइंट हर्सुल (4), नॅशनल कॉलनी (1), निर्मलादेवी नगर, मुकुंदवाडी (1), हनुमान नगर (1), भावसिंगपुरा (1), सुधाकर नगर (1), नागेश्वरवाडी (1), सातारा परिसर (2), भीम नगर (1),वेदांत नगर (1), जालन नगर (3), बीड बायपास (1), अजब नगर (2), बालाजी नगर (1), हमालवाडा (1), उस्मानपुरा (2), खोकडपुरा (1), बन्सीलाल नगर (2), गारखेडा परिसर (2), संग्राम नगर, सातारा परिसर (2), एन अकरा (1), बजरंग चौक (1), श्रीकृष्ण नगर, हडको (2), हर्सुल (2), एन सहा सिडको (1)

सिटी एंट्री पॉइंट (63)

देवळाई (2), पिसादेवी (3), सिडको एन नऊ (2), हर्सूल (2), पवन नगर (5), आंबेडकर नगर (1),हर्सूल सावंगी (1), टीव्ही सेंटर (3), रोशन गेट (2), पीरबावडा (1), पिंप्री राजा (3), टाकळी (1), चिकलठाणा (2), कोकणवाडी (1), गुलमंडी (1), निपाणी (2), शेवगाव (1), सातारा परिसर (4), चित्तेगाव (1), रांजणगाव खु. (1), बजाज नगर (1), कांचनवाडी (1), गुलमोहर कॉलनी (1), गारखेडा (1), कन्नड (1), भगतसिंग नगर (5), म्हसोबा नगर (1), मयूर पार्क (3), एसटी कॉलनी (7), नवजीवन कॉलनी (1), जहांगीर कॉलनी, हर्सुल (1), सिडको एन पाच (1)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत एकोड पाचोड येथील 62 वर्षीय स्त्री, गंगापूर तालुक्यातील कोलघर येथील 60 वर्षीय पुरूष, शहरातील नवजीवन कॉलनीतील 75 वर्षीय पुरुष आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात बीड बायपास रोडवरील दिशा नगरीतील 91 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयांत कटकट गेट येथील 56 वर्षीय स्त्री, एअरपोर्ट कॉलनीतील 50 वर्षीय पुरूष, वाळूज पोलिस स्टेशन जवळील 76 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top