Sunday, 19 Jan, 6.30 pm AM News

स्पोर्ट्स
IND Vs AUS | भारताची चांगली सुरूवात, मालिका विजयासाठी 287 धावांचे लक्ष

स्पोर्ट्स डेस्क । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीला आला आणि 50 षटकांत 9 विकेट गमावून 286 धावा केल्या आणि मालिका जिंकण्यासाठी भारताला 277 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने कोणतीही विकेट न गमावता 3 षटकांत 20 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा (9 धावा) आणि केएल राहुल (5 धावा) क्रीजवर आहेत.

प्रथम फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने 50 षटकांत 9 विकेट गमावून 286 धावा केल्या आणि मालिका जिंकण्यासाठी भारताला 287 धावांचे लक्ष्य दिले. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियन संघासाठी सर्वाधिक 131 धावा केल्या. स्मिथशिवाय मार्नस लब्युचेनने 54 आणि अ‍ॅलेक्स कॅरीने 35 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 4 गडी बाद केले. रवींद्र जडेजाने 2 गडी बाद केले. नवदीप सैनी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.




शबाना आझमी यांचा अपघात, समोर आला वैद्यकीय तपासणीचा अहवाल


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top