Sunday, 25 Aug, 7.10 pm AM News

महाराष्ट्र
ईव्हीएम मशिनच्या सेंटीगसाठी देवेंद्र फडणवीस गिरीश महाजनांना घेऊन महाराष्ट्र भर फिरत आहेत - सतिश पाटील

ईव्हीएम मशिनच्या सेंटीगसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना घेऊन महाराष्ट्र भर फिरत आहेत. अशी टीका शेंदुर्णी येथे झालेल्या शेंदुर्णी सहकारी खरेदी-विक्री जिनिंग-प्रेसिंग सोसायटीच्या हॉल उद्घाटनाप्रसंगी जळगाव माजी पालकमंत्री आमदार सतिश अण्णा पा टील यांनी केली. महाराष्ट्रभरात निघालेली महाजनादेश यात्रा ही लोकांच्या विकासासाठी नाही तर सरकारच्या ईव्हीएम सेंटीगसाठी आहे, अशी टीका जामनेर तालुक्यातील शेदुर्णी येथील शेदुर्णी सह.खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटी लिं.शेदुर्णी यांच्या मार्फत कै. विश्वनाथ रा. गरूड बहुउदेशीय हॉल आणि विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभात डॉ. सतीश पाटील बोलत होते.

जामनेर येथे झालेल्या महाजनादेश यात्रेच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामनेर करांना सांगितले होते की, गिरीश महाजन आता जामनेरला फक्त विधानसभेचा फॉर्म भरायला व निवडून आल्यानंतर निवडणूक जिंकल्याचे पत्र घ्यायला येतील तो पर्यंत ही सर्व जबाबदारी मी जामनेर करांवर सोडतो. आणि गिरीश महाजन यांना महाराष्ट्रभर घेऊन फिरतो. या वक्तव्याचा माजी पालकमंत्री सतिश अण्णा पाटील यांनी चागंलाच समाचार शेदुर्णी येथील कार्यक्रमात घेतला. यावेळी व्यासपीठावर विधानसभा माझी अध्यक्ष अरूणभाई गुजराती, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, मा. आ.शिरीष चौधरी, राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष रविंद्र भैया पाटील उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील शेतकरी वर्ग सुध्दा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.





Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top