Monday, 21 Sep, 11.30 am AM News

चालू घडामोडी
कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 732 जणांना कोरोनाची बाधा; 38 जणांचा मृत्यू

सातारा । साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज जिल्ह्यात पुन्हा 732 जणांना कोरोनाची लागण झाली असून; 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 30 हजार 824 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 9 हजार 708 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 866 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 20 हजार 250 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे.



Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top