Sunday, 20 Sep, 12.10 pm AM News

मुख्यपृष्ठ
कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 977 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजारांच्या पार

सातारा । साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, आज 977 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 30 हजार 92 एवढा झाला आहे. जिल्ह्यात सध्या 9 हजार 398 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 828 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 19 हजार 866 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 62 हजार 579 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.



कोरोना अपडेट | सांगली आज 830 जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजारांच्या पार



Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top