Sunday, 20 Sep, 5.10 pm AM News

महाराष्ट्र
कोरोना अपडेट | सोलापूरात आज 584 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजारांच्या पुढे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. आज जिल्ह्यात 584 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 28 हजार 786 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 7 हजार 859 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 हजार 29 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 19 हजार 898 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, सोलापूरकरांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top