Monday, 21 Sep, 12.10 pm AM News

महाराष्ट्र
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला; पंढरपुरात आंदोलनाचे तीव्र पडसाद

पंढरपूर । मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. तात्काळ स्थगिती उठवावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज जिल्हा 'बंद'ची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंढरपूर शहर व तालुक्यात बंद पाळण्यात येणार आहे. व प्रमुख रस्त्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आज पहाटेपासूनच जिल्ह्यातील माढा, निमगाव पाटी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुर-पुणे महामार्ग बंद केले आहे.

आंदोलनाच्या कालावधी एसटी सेवा सुरु ठेवल्यास कोणताही अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता आहे. म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी रात्री 12 ते सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्याचे आदेश आगार प्रमुखांना दिले आहे. त्यामुळे आज पंढरपूर बंदच्या वेळी पंढरपुरातून जाणारी सर्व एसटी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती पंढरपूरातील आगार प्रमुख यांनी दिली आहे.अखेर मनसेचा सविनय कायदेभंग यशस्वी; पोलीस बंदोबस्त तोडून मनसे सैनिकांनी केला लोकलमधून प्रवासDailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top