Sunday, 20 Sep, 5.10 pm AM News

महाराष्ट्र
मोदी सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात पंजाबमध्ये शेतकरी उतरले रस्त्यांवर

चंदीगड । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 7 वा दिवस होता. एकीकडे राज्यसभेत प्रस्तावित असलेली शेती विधेयकाला देशभरात शेतकऱ्यांकडून विरोध होत होता. मात्र आज हे विधेयकं मांडण्यात आली. त्यादरम्यान विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ केला; मात्र तरी सुद्धा कृषी विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आली. तर दुसरीकडे मात्र, कोरोनाच्या काळातही पंजाब-हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मात्र या विधेयकाविरुद्ध आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. अनेक शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहेत. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी 'रस्ता रोको' आंदोलन करत महामार्ग ठप्प केले आहेत.

शेकडोंच्या संख्येने शेतकरीवर्ग सरकारच्या धोरणाविरोधात पंजाबच्या अंबाला रस्त्यांवर उतरले आहेत. तर काही शेतकरी ट्रॅक्टरसहीत रस्त्यावर आले असून त्यांनी सरकारविरूद्ध जोरदार घोषणाबाजीही केली. अनेक आंदोलनकर्त्यांनी झेंडे आणि बॅनर दाखवत सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेद केला. पंजाबमधून अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यापार्श्वभुमीवर अंबालापासून ते दिल्लीपर्यंत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

कोरोना अपडेट | सोलापूरात आज 584 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजारांच्या पुढे


विरोधकांच्या गोंधळात केंद्र सरकारचा कृषी विधेयक राज्यसभेत संमत


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top