Sunday, 19 Jan, 8.10 pm AM News

महाराष्ट्र
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात 4 जण जागीच ठार

मुंबई । आज सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील आमटेम गावानजीक इको कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात इको कार मधील 4 जण जागीच ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एम एच 01 सी जे 3922 ही इको कार मुंबई लालबाग येथील असून या कार मधील 4 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता संतोष दयाराम भोनकर, राहणार धोबिघाट मुंबई, संतोष सिताराम साखरकर राहणार मानखुर्द आणि तिसऱ्या व्यक्तीचे पूर्ण नाव मिळाले नसून चांदोरकर असे या मृत व्यक्तीचे आडनाव आहे. या तीनही मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका मृताला एका मृताला नागोठणे येथे नेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या अपघातातील जखमींची संख्या कळाली नसली तरी 2 जणांना पनवेल कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top