Monday, 21 Sep, 11.30 am AM News

चालू घडामोडी
नागपूरात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासात 1266 जणांना कोरोनाची बाधा; 54 जणांचा मृत्यू

नागपूर । नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात 1266 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 63 हजार 757 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 10 हजार 157 जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत उपचारादरम्यान सुमारे 2 हजार 44 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 51 हजार 556 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज आढळलेल्या 1266 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 228 तर मनपा हद्दीताल 993 जणांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून, रोजच हजारोंनी वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.



Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top