Tuesday, 11 Aug, 7.11 pm AM News

महाराष्ट्र
नियमित दुकाने उघडण्यास परवानगी द्या अन्यथा.., व्यापारी वर्गाचा प्रशासनाला इशारा

मीरा भाईंदर(ठाणे) सम विषम पद्धत रद्द करून नियमित दुकाने उघण्याची परवानगी द्या या मागणीसाठी आज मीरा भाईंदर मधील व्यापारी वर्गाने पालिका मुख्यप्रवेशद्वारा समोर ठिय्या मांडला. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. मनपा उपायुक्त महेश वरूडकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. नियमित दुकाने उघण्यास तात्काळ परवानगी द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

टाळेबंदीमुळे शहरांतील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे नियम लागू करण्यात आले होते. टप्याटप्याने टाळेबंदी मध्ये शिथिलता करण्यास सुरुवात केली, शहरातील दुकाने सम-विषम नियम पद्धती उघडण्यास मुभा देण्यात आली. मात्र आता दुकाने कायमस्वरूपी उघडण्यास परवानगी द्या अशी मागणी अनेक दिवसांपासून व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून अधिकृत परवानगी नसल्याने व्यापारी वर्गाला आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर दुकाने उघडण्यास परवानगी द्या. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करु असा इशारा व्यापारी वर्गाने दिला आहे.
परभणीत आणखी 28 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top