Tuesday, 11 Aug, 7.11 pm AM News

मुख्यपृष्ठ
परभणीत आणखी 28 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण

परभणी | जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. आज मंगळवारी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये तब्बल 28 व्यापारीही हे कोरूना बाधित आढळून आले आहेत. गेल्या पाच दिवसात तब्बल 99 व्यापारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

परभणी जिल्ह्यात रुग्ण संख्येचा उद्रेक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तब्बल 80 च्या वर रुग्ण गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत यामुळे परभणीकरांची चिंता आता वाढली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील किरकोळ भाजी विक्रेते यांच्यासह व्यापाऱ्यांची गेल्या पाच दिवसापासून तपासणी करण्यात येत आहे.

शहरात कार्यान्वित केलेल्या केंद्राद्वारे या व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 1349 व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून तब्बल 99 व्यापारी हे कोरोणा बाधित असल्याचे समोर आल्याने मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने देखील परभणी शहर कडकडीत बंद ठेवले आहे परभणी शहरासह लगतच्या पाच किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली आहे मात्र प्रशासनाने कठोर अशी पावले उचलली असतानाही नागरिक मात्र मोठ्या संख्येने रस्त्यावर फिरताना पाहावयास मिळत आहेत.

दरम्यान महापालिका प्रशासनाने देखील परभणी शहरातील सोळा प्रभागात पालक प्रतिनिधी म्हणून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे हे कर्मचारी प्रत्येक प्रभागात जनजागृती करून नागरिकांना माहिती देणार आहेत त्याचबरोबरनागरिकांना जर त्रास जाणवू लागला तर तात्काळ वैद्यकीय तपासणी ही करण्यात येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top