Sunday, 19 Jan, 6.10 pm AM News

महाराष्ट्र
शबाना आझमी यांचा अपघात, समोर आला वैद्यकीय तपासणीचा अहवाल

पुणे | मुंबई- पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर शनिवारी जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा अपघात झाला होता. यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर त्यांच्यावर नवी मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. यानंतर त्यांना मध्यरात्री अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आता शबाना आझमी यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. केडीएएचमध्ये वैद्यकीय तपासणीनंतर एक्झीक्यूटीव्ह डायरेक्टर आणि सीईओ यांनी शबाना यांची तब्येतीत सुधारणा असल्याचे सांगितले आहे. तसेच सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी शबाना यांना एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ (लेफ्टनन्ट) केआर सालगोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार शबाना आझमी यांच्या एक्स रे, सीटी स्कॅन, अल्ट्रासाउण्ड आणि अन्य तपासण्याच करण्यात आल्या. त्यांना डोकं, मान, सर्वाइकल स्पान, चेहरा आणि उजव्या डोळ्याला दुखापत झाली आहे. डॉक्टर म्हणाले की त्या शुद्धीत होत्या आणि बोलत होत्या. आता त्यांची प्रकृती चांगली आहे.

शबाना आझमी व त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर कारने पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. दरम्यान खालापूर टोलनाक्याजवळ त्यांचा भीषण अपघात झाला. कारने ट्रकला मागून धडक दिली. यामुळेच हा अपघात झाला. शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये शबाना आझमी आणि कारचालक गंभीर जखमी झाले. अमलेश कामत असे आझमी यांच्या वाहन चालकाचे नाव आहे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top