Sunday, 20 Sep, 2.14 pm AM News

महाराष्ट्र
शेती विधेयक मंजूर झाल्यास सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार का? - खासदार संजय राऊत

नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 7 वा दिवस आहे. राज्यसभेत प्रस्तावित असलेली शेती विधेयकाला देशभरात शेतकऱ्यांकडून याचा विरोध होत होता. मात्र आज हे विधेयक मंजूर करण्यात आली. लोकसभेत या विधेयकांच्या मंजुरीसाठी पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मात्र आपली भूमिका बदलली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला धारेवर धरत; केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची हमी देणार का, असा थेट सवाल केला. आज राज्यसभेत केंद्र सरकारकडून शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक सेवा अशी तीन विधेयके सादर करण्यात आली.

ही विधेयके कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणत असतील तर मग देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने का केली जात आहेत, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने एक दिवसाचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही त्यांनी राज्यसभेत केली. ही विधेयके मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा प्रश्नही त्यांना विचारला. तसेच कृषी विधेयकाला शेतकऱ्यांकडून का विरोध आहे? त्यांच्यावर काठ्या का चालवल्या जात आहेत?, असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.विरोधी पक्ष शेतकरी विधेयकांविषयी शेतकऱ्यात अफवा पसरवतात, असे केंद्राने म्हटले आहे.
कोरोना अपडेट | सांगली आज 830 जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजारांच्या पार


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top