Wednesday, 05 Aug, 10.30 am AM News

चालू घडामोडी
शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अहमदनगर | शिवसेनेचे माजी मंत्री तसेच माजी आमदार अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्रकृती बरी नसल्याने काही दिवसांपूर्वी ते खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार चालू असताना बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

गेली 30-35 वर्ष नगर शहराच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या राठोड यांच्या निधनाने शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. सलग पाच वेळा त्यांनी विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व केले. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यात त्यांनी सिंहाचे योगदान दिले होते. शहराच्या राजकारणावर प्रचंड दबदबा असलेल्या राठोड यांची नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती कळल्यावर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

शिवसेना व हिंदुत्वाशी कायम एकनिष्ठ राहत त्यांनी राजकारण, समाजकारण केले. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. त्यामुळे सलग पाच वेळा नगरची आमदारकी त्यांनी भूषवली. युती सरकारच्या काळात काही काळ त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषविले होते. सहकारसम्राट, साखरसम्राटांच्या नगर जिल्ह्यात शिवसेना रुजवून ती फोफावण्याचे काम राठोड यांनी केले."बाबरी मस्जिद होती आणि राहणार" अयोध्येतील सोहळ्याआधीच ओवेसींचे ट्विटDailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top