Friday, 03 Jul, 3.10 pm AM News

महाराष्ट्र
श्रीगोंदा | अट्टल दरोडेखोरांचा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, 4 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा | पोलिसांनी नऊ चोरीचे गुन्हे, दरोडा, जबरी चोरी असे गुन्हे करणारी आठ दरोडेखोरांच्या मोठ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यात चोरी केलेला ४ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६ दुचाकी, ३ इलेक्ट्रिक मोटार, १ सोन्याचे मंगळसूत्र असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अनिल लहू गायकवाड, चंद्रकांत सुरेश गायकवाड दोघे रा भिंगाण, अनिल संभा काळे रा पिंपळवाडी ता कर्जत, अमोल काळू माळी रा भिंगाण, सुरेश देवराम गायकवाड रा भिंगाण, शरद अंकुश गायकवाड रा भिंगाण, महेंद्र गंडीशा काळे रा धालवडी ता कर्जत, दीपक सुरेश गायकवाड रा भिंगाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या टोळीने श्रीगोंदयात विविध ठिकाणी अनेक गुन्हे केले आहेत. या आरोपीपैकी अनिल गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, अनिल काळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एक तलवार देखील हस्तगत केली आहे.तसेच वरील आरोपींच्या मदतीने अनेक गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे .

एका गुन्ह्याच्या तपासात अनेक चोरीचे गुन्हे उघड होऊन चोरीचा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे दि १५ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शहरातील घोडेगाव रस्त्यावरील भोळेवस्तीजवळ सात दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून फिर्यादिस मारहाण करून सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल चोरून नेला होता त्याबाबत श्रीगोंदा पोलीस दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास कर्जत पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रगटीकरणं शाखेचे सहायक पो निरीक्षक राजेंद्र सानप हे करत होते. ३० जून रोजी सानप यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हे शेडगाव गावच्या शिवारात आले असल्याची माहिती गुप्त बतमीदारामार्फत मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत तीन आरोपीना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक संजय सातव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरणं शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉस्टेबल अंकुश ढवळे,पोलीस कॉस्टेबल प्रकाश मांडगे,पोलीस कॉस्टेबल संजय काळे,गोकुळ इंगवले, प्रताप देवकाते,योगेश सुपेकर, किरण बोराडे,तसेच अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top