Sunday, 19 Jan, 8.10 pm AM News

महाराष्ट्र
तहसीलदाराला खुर्चीत बसवून काम होत नाही, त्यांच्याकडून कामं करून घेता आली पाहिजे, दानवेंचा टोला

नाशिक । शिवाजी महाराजांच्या वंशाचा प्रश्न निर्माण करून सरकार जनतेच्या प्रश्नांची दिशाभूल करतय. तहसीलदाराला खुर्चीत बसवून काम होत नाही. त्यांच्याकडून काम करून घेता आली पाहिजे, असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. अमर अकबर आणि अँथनी असं सरकार आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असही दानवे यावेळी म्हणाले. केंद्राच्या योजनेला ब्रेक न लावता, राज्यात चांगल्या योजना आणाव्यात असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरतीवर केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की, त्यांच्या विधानाची मोडतोड केली. सर्वानुमते निर्णय घेणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे मेगाभरतीचा निर्णयदेखील सर्वानुमते घेण्यात आला होता. CAA हा नागरिकत्व देणारा कायदा असून कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा नाही. फाळणी झाली तेव्हा 24 टक्के पाकिस्तान मध्ये हिंदूंची संख्या होती मात्र आता 3 टक्के आहे. बांग्लादेश मध्येही तीच परिस्थिती आहे. विरोधकांनी सुरुवातीपासून याविषयी गैरसमज पसरवला. भाजपच्या मुस्लिम कार्यकर्त्यांना सर्व परिस्थिती समजली आहे, ते ही जनजागृती करत आहे, असही दानवे यावेळी म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top