Sunday, 19 Jan, 5.10 pm AM News

महाराष्ट्र
व्हिडिओ । गाडगेबाबांच्या किर्तनावर खासदार नवनीत राणांनी टाळ वाजवत धरला ताल

अमरावती | जिल्यातील भातकुली तालुक्यातील गाडगे महाराजांची कर्मभुमी म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या ऋणमोचन येथे गाडगे बाबांनी 1907 साली पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी अंध-अपंग, कुष्ठरोगी, वृद्ध, दीन दुबळे, निराधारांसाठी अन्नदान आणि वस्त्रदान आणि पंचपकवान करण्याची मुहूर्तमेढ रोवली. त्या वर्षापासून आज 104 वर्ष उलटूनही तीच परंपरा आजही कायम आहे.

ऋणमोचन येथील लक्ष्मि नारायण संस्थेच्या वतीन हा उपक्रम येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात राबविल्या जातो. या उपक्रमात सहभागी होण्याकरिता संपूर्ण विदर्भातील हजारो अंध -अपंग, कुष्ठरोगी, वृद्ध,दीन दुबळे, निराधार सकाळीच ऋणमोचन येथे हजेरी लावतात. तर या निराधारांना अन्नदान आणि वस्त्रदान करण्याकरिता अमरावती विभागातील अनेक दानशूर नागरिक हि मोठ्या संखेने येथे उपस्थित राहतात. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा अनेकांना साड्या आणि ब्लॅंकेटचे स्वतः वाटप केले आणि गाडगेबाबांच्या किर्तनावर टाळ वाजवून कीर्तनाचा आनंद घेतला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top