Sunday, 19 Jan, 5.10 pm AM News

महाराष्ट्र
विधानसभा निवडणुकीत भाजपनं दगा केला, शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा थेट आरोप

जालना । विधानसभा निवडणुकीत भाजपनं काम केलं नसल्याचा थेट आरोप शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे. त्यामुळं दानवे विरुद्ध खोतकर वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या वेळी रावसाहेब दानवे आजारी होते. त्यामुळं इमानेइतबारे मी आणि माझं संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या प्रचाराला लागलो होतो. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत दानवे माझ्यासोबत फिरले मात्र कार्यकर्त्यांनी काम केलं नसल्याचा खोतकरांनी म्हंटलंय. वरच्या पातळीवर दानवे माझ्या सोबत होते. मात्र खालच्या पातळीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. यावर मी वेळ आल्यावर बोलेल असं म्हणत खोतकरांनी आपली खदखद व्यक्त केलीये. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली म्हणून मी तुमची क्षमा मागतो असं वक्तव्य करत शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपली खंत बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे यांचा भोकरदनमध्ये जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अर्जुन खोतकर बोलत होते. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी दंड थोपटले होते. लोकसभा निवडणूक लढवून दानवेंना चितपट करणार असल्याचा पवित्रा खोतकरांनी घेतला होता. मात्र पक्षश्रेष्ठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर आज प्रथमच खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली नसल्याची खंत जाहीर रित्या व्यक्त केली. एका पाण्यानं देव म्हतारा होत नसतो असं म्हणत पुन्हा एकदा दानवे विरूद्ध खोतकर असा लढा पाहायला मिळणार असल्याचे संकेत खोतकरांनी यावेळी दिलेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top