Sunday, 20 Sep, 3.11 pm AM News

महाराष्ट्र
विरोधकांच्या गोंधळात केंद्र सरकारचा कृषी विधेयक राज्यसभेत संमत

नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 7 वा दिवस आहे. राज्यसभेत प्रस्तावित असलेली शेती विधेयकाला देशभरात शेतकऱ्यांकडून या विरोध होत होता. मात्र आज हे विधेयक मांडण्यात आली. त्यानंतर संसदेच्या वरिष्ठ सदनात चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विरोधकांना उत्तर दिले. तोमर उत्तर देत असतांना विरोधकांनी राज्यसभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. या गोंधळाच्या वातावरणातचं कृषि विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आली आहे. तसेच विरोधकांनी उपसभापतींच्या निर्णयावर राज्यसभा खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोड केली. तसेच सभागृहातच नियम पुस्तिका फाडली असून माईकसुद्धा तोडण्यात आले. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.


शेती विधेयक मंजूर झाल्यास सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार का? - खासदार संजय राऊत


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top