Wednesday, 23 Sep, 5.33 pm AMC Mirror

होम
शहरातील 68 नगरसेवकांनी सांगावे, आता आम्ही कोणाला काळे फासावे?

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहरातील बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये गरोदर मातांना बाळंतपणासाठी 3000 ते 5000 रुपये खर्च येत आहे. शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा मिळावी, या करीता भाई बार्शीकरांनी या हॉस्पिटलची निर्मिती केली. परंतु आज याच हॉस्पिटलची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या अवस्थेकडे लक्ष वेधले आहे.

बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये लॅबॉरेटरी बंद आहे. रक्तपेढी बंद आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा होत नसल्यामुळे तेथील रुग्णांच्या नतेवाईकांना पैसे खर्च करुन बाहेरुन मेडिकलमधून औषधे आणावी लागतात. दर महिन्याला जवळपास 300 ते 350 गरोदर महिला बाळंतपणासाठी या ठिकानी येतात. आहेत त्या सुविधा बंद पडल्याने रक्त, लघवी तपासणी लॅबॉरेटरी बंद असल्यामुळे खाजगी लॅब मध्ये तपासणी करवी लागते. त्याचा खर्च 1000 ते 2000 हजार रुपये येतो. अचानक रक्त लगले तर दुसरीकडे खाजगी रक्त पेढीतुन खर्च करुन रक्त घ्यावे लागते. त्यामुळे नाहक गोरगरीब जनतेला हजारो रुपये खर्च करावे लागतात.

बाळंतपणात सिझरसाठी भूलतज्ञ महानगरपालिकेकडे नसल्यामुळे रात्री अपरात्री गरोदर मतांना खाजगी हॉस्पिटल मध्ये जावे लागते. तसेच पांढरी कावीळ, HIV रुग्णांना बाळंतपणासाठी पुणे येथील ससुन रुग्णालयात हलवावे लागते.
एमआरआय मशीन सारखीच परीस्थिती रक्त पेढीतील मशीनची झाली असुन सर्व टेक्निशियन असतांना 2016 साली 1 करोड रुपये खर्च करुन खरेदी केलेली मशीन आज बंद आहे. या सर्व समस्येमुळे गरीब लोकांवर नाहक खर्च करण्याची वेळ येते, अशी अवस्था झाल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले.

अनेकवेळा महापौरांनी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलला भेट दिली. परंतु त्यात सुधारणा होण्यापेक्षा बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलची परस्थिती गंभीर व बिकट होत चालली आहे. या प्रश्नावर कुणी नगरसेवक बोलत नाही. अनेक महिला नगरसेवक असून सुध्दा एकाही महिला नगरसेविकेला बाळंतपणासाठी महिलांना येत असलेल्या अडचणींची दखल घ्यावी वाटली नाही. साधे प्रशासनाचे लक्षही वेधले नाही. या सर्व प्रकरणाला आयुक्त व महापौरच जबाबदार आहेत. त्यांच्यासह अहमदनगर महानगरपालिकेतील 68 नगरसेवकांचा ढिसाळ कारभार याला जबाबदार आहे. त्यामुळे आता आम्ही कोणाच्या तोंडाला काळे फासावे? असा सवाल नितीन भुतारे यांनी केला आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AMC Mirror
Top