Sunday, 08 Mar, 7.27 pm आरोग्यनामा

माझं आरोग्य
WHO नं इशारा देत सांगितलं - 'गर्मीमुळं कोरोना व्हायरस नष्ट होत नाही'

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोविड-19 म्हणजेच कोरोना व्हायरसबाबत इशारा जारी केला आहे. डब्ल्यूएचओनुसार हे समजणे सर्वात मोठी चूक असेल की, उन्हाळ्यामुळे जीवघेणा कोरोना व्हायरस नष्ट होईल. डब्ल्यूएचओने कोविड-19 ची लागण झालेल्या सर्व देशांना याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जर गरमीमुळे हा व्हायरस नष्ट झाला तर ते देवाच्या वरदानासारखे असेल.

डब्ल्यूएचओचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर डॉ. माईक रायन यांनी शुक्रवारी जिनेव्हात म्हटले की, कोविड -19 (कोरोना व्हायरस) च्या संसर्गाची क्षमता वाढत आहे आणि हे हंगामी इन्फेक्शन आहे आणि गरमीमध्ये आपोआप गायब होईल, असा आतापर्यंत एकही दाखला मिळालेला नाही. आपली श्वसन प्रणाली प्रभावित करणारा फ्लू आणि इनफ्लुएंजा सारखा संसर्ग मोसमी असतो आणि उन्हाळ्यात त्याचा परिणाम खुपच कमी होतो. परंतु, कोविड-19 (कोरोना व्हायरस) बाबत असे बोलता येणार नाही.

कोविड-19 बाबत अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले होते की, हा जीवनघेणा व्हायरस उन्हाळ्यात आपोआप गायब होईल. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या डायरेक्टर डॉ. नैंसी मेसोनियर यांच्यानुसार फ्लू आणि इनफ्लुएंजा सारखे श्वसन प्रणालीला संसर्ग करणारे आजारात असे दिसते की उन्हाळ्यात ते गायब होतात. यामुळे अशी आशा करता येऊ शकते की, कोविड-19 जुलैपर्यंत नष्ट होईल. परंतु, डब्ल्यूएचओने सीडीसीच्या या मताचे जोरदार खंडन केले आहे.

यापूर्वी सोमवारी डब्ल्यूएचओने म्हटले होते की, आतापर्यंत कोविड-19 च्या व्यवहाराबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हते. हा इनफ्लुएंजाच्या व्हायरससारखा नाही. हा वेगळा व्हायरस आहे, त्यामुळे तो कसा व्यवहार करतो हे ठोसपणे सांगता येणार नाही. डब्ल्यूएचओने चिंता व्यक्त केली आहे की, कोविड-19 साठी अनेक देशांची तयारी अर्धवट आहे. यामुळेच अमेरिका आणि इटलीसारख्या देशांमध्ये याचा परिणाम दिसून येत आहे. या देशांची आरोग्य व्यवस्था यासाठी पूर्णपणे तयार नव्हती.

आतापर्यंत जगभरात या जीवघेण्या व्हायरसची 1 लाख प्रकरणे समोर आली आहेत. सर्वात जास्त संसर्ग झालेल्या देशांमध्ये चीन, इराण, दक्षिण कोरिया आणि इटली यांचा समावेश आहे. अमेरिकेमध्ये 233 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत आणि 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात 33 रूग्ण सापडले असून 20 पेक्षा जास्त लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: ArogyaNama
Top