स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आपल्या भाषेत स्टेट बँकेत गेल्यावर तुम्हाला अनेक सेवा मिळतात. पैसे बचत खात्यात, मुदत खात्यात भरणा करणे, पैसे आपल्या खात्यातून काढणे, कुणालातरी ट्रान्सफर करणे, कर्ज उचलणे, कर्ज भरणा करणे यांसारख्या नेहेमीच्या कामाबरोबर आजकाल बँक इतर अनेक सेवा देत असते. पारंपरिक व्याजाच्या उत्पन्नाबरोबर विविध उत्पन्नांचे स्रोत बँकांनी सुरु केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने क्रेडिट कार्ड, विमा विक्री, म्युच्युअल फन्ड्स विक्री असे प्रमुख व्यवसाय बँक करत असतात.
या व्यवसायात झालेल्या मूल्यवृद्धीचा फायदा घेण्यासाठी आणि भांडवल उभे करण्यासाठी एस.बी.आय. कार्ड्स आपला आय.पी.ओ. शेअर बाजारात घेऊन येत आहे.
सेबीला दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स नुसार ९६०० कोटी रुपये गोळा केले जाणार आहेत. तुमचा पुढचा प्रश्न तयार असेल की या पैशाचे कंपनी काय करणार आहे ? यासाठी आपण एस.बी. आय. कार्ड्सचा इतिहास बघूया.
- ऑफर फॉर सेल (Offer For Sale = OFS): यामध्ये कंपनीचे प्रवर्तक स्वतःकडील शेअर्स आय.पी.ओ. द्वारे इतर लोकांना विकतात. आय.पी.ओ. सबस्क्राईब करतांना गुंतवणूकदार कंपनीमध्ये प्रत्यक्ष पैसे गुंतवत नसतात. हे पैसे प्रवर्तकांना त्यांच्या शेअर्स च्या बदल्यात मिळतात.
- फ्रेश इश्यू (Fresh Issue): यामध्ये गुंतवणूकदार शेअर्स विकत घेऊन कंपनीला व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उपलब्ध करून देत असतात.
एस.बी.आय.कार्ड्सचे शेअर होल्डिंग पुढीलप्रमाणे आहे
३० सप्टेंबर २०१९ पर्यंत
एस.बी.आय.कार्ड्स बाबत :
कंपनीची आर्थिक कामगिरी (रुपये कोटींमध्ये)
(Total Assets)
(Total Sales)
(PAT : Profit After Taxes)
- सी.ए. अभिजीत कोळपकर
(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात).
(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-

