Monday, 10 Feb, 8.04 am अर्थसाक्षर

नवे लेख
गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

अर्थार्जन सुरु झाल्यावर प्रत्येकजण गुंतवणुकीचा विचार करत असतो. भविष्याची तरतूद म्हणून योग्य गुंतवणूक करणे काळाची गरज आहे. गुंतवणुकीचे लोकप्रिय आधुनिक पर्याय म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी. या गुंतणुकींमध्ये सकारात्मक गोष्टींसोबत काही खाचखळगेसुद्धा तेवढेच पाहायला मिळतात. २०१८ साली मालमत्ता खरेदी म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात बऱ्याच नकारात्मक गोष्टी दिसून आल्या.यामुळे गुंतवणुकीसाठी हे क्षेत्र फारसा फायद्याचं राहिले नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी व काही चुका कटाक्षाने टाळायला हव्यात.

१. नियमितपणे गुंतवणूक करावी -

 • सर्वसाधारण वयाच्या २५ ते ३० दरम्यान फारशी कौटुंबिक जबाबदारी नसते, म्हणून याच काळात गुंतवणुकीचे नियोजन करण्यास वाव असतो.
 • पगाराच्या ३५-४०% रक्कम गुंतवली जाऊ शकते अर्थात ही रक्कम व्यक्तिसापेक्ष बदलते. पुढे इतर खर्च सुरु झाले की गुंतवणुकीची मर्यादा २०-२५% सुद्धा होऊ शकते.
 • थोडक्यात एकंदरीत भविष्याचा आणि आर्थिक धोरणाचा विचार केल्यास संप्पती एकीकरणासाठी आपल्या उत्पन्नानुसार नियमित गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
 • २. भारताच्या भविष्यातील आर्थिक धोरणाविषयी खूप आशावादी किंवा अगदीच निराशावादी असणे -

 • भारत हा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा लोकशाही देश आहे. भारताची अर्थव्यवस्था जितकी वेगाने घोडदौड करेल तितक्याच वेगाने कोसळूही शकते. अगदीच व्हेनेझुएला देशासारखी आपली अर्थव्यवस्था वेगाने कोसळणारही नाही ही एक सकारात्मक बाजू आहे.
 • चीन सारख्या हुकूमशाही राजवटी असणाऱ्या देशाने वेगाने प्रगती केली हे आपल्या देशाच्या बाबतीत होऊ शकणार नाही कारण आर्थिक प्रगती सोबत सर्वांगीण विकासाची धोरणेही तितकीच महत्वाची आहेत.
 • मात्र काही अर्थशास्त्रीय नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास भारताची अर्थव्यवस्था उर्वरित देशांच्या तुलनेत वेगाने पुढे जाऊ शकते.
 • थोडक्यात सांगायचं तर बाजारपेठेत होणारे आर्थिक बदल हे कालांतराने बदलतात. कधी मार्केटमध्ये तेजी असू शकते, तर कधी मंदी येऊ शकते. अशावेळी आक्रमकपणे कुठलेही निर्णय न घेता इतर आर्थिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घ्यावा व मगच निर्णय घ्यावेत.
 • ३. जागतिक आर्थिक बातम्या व अंदाजांना जास्त महत्व देणे -

 • २४*७ वेळ सेवा देणाऱ्या मिडियाचे आभार कारण जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम मिडिया करत असतो.
 • भारताची अर्थव्यवस्था ही देशांतर्गत अर्थव्यवस्था असली तरी इतर बाह्य घटना म्हणजे अमेरिका-चीन व्यापारिक युद्ध वैगरे अशा घटनांचा थोडाफार परिणाम होतच असतो. त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय घेताना केवळ जागतिक घडामोडींवरून अंदाज बांधताना देशांतर्गत आर्थिक घडामोडींचाही विचार करूनच
 • ४. मालमत्ता विभाजनाकडे दुर्लक्ष होणे -

 • मालमत्तेचं योग्य विभाजन करणे हा सर्वसाधारण नियम आहे.
 • रिअल इस्टेट क्षेत्रात वारंवार होणारे बदल, मालमत्तेचे बदलणारे बाजारभाव या गोष्टींपासून विचलित होऊ नका.
 • मालमत्तेचं विभाजन योग्यरीत्या केल्यास या क्षेत्रातील गुंतवणूक फायद्याची ठरते.
 • ५. आर्थिक सल्लागारांची फी वाचवण्यासाठी सल्ला न घेणे -

 • हल्ली अनेक तज्ञ आणि अभ्यासू आर्थिक सल्लागार पाहायला मिळतात. अर्थात त्यांची फी घेतल्याशिवाय ते सल्ला देणार नाहीत कारण चांगला सल्ला फुकट मिळत नसतो.
 • नवीन गुंतवणूकदारांनी मात्र आर्थिक बाजारपेठेत यशस्वी गुंतवणूक करायची असेल, तर फी चा विचार न करता सल्लागारांचे मार्गदर्शन घ्यावे. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवरील लागणारा खर्च रोखण्यासाठी सेबीचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
 • तरीही सध्या केवळ खर्चाचा विचार न करता गुंतवणुकीची अनुकूलता आणि स्थिरता यावर लक्ष द्यायला हवे,यासाठी आर्थिक सल्लागार नेमणे आवश्यक आहे.
 • Dailyhunt
  Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: ArthaSakshar
  Top