दोनेक आठवड्यांपूर्वीची गोष्ट असेल. एका स्नेह्यांकडील घरगुती समारंभात एकांशी भेट झाली. इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा झाल्या, काय करता वगैरे झाले. गुंतवणूक सल्लागार आहे म्हटल्यावर त्यांनी एकदम प्रश्न केला, "माझ्याकडे आत्ता लाखभर रुपये आहेत, कुठली स्कीम सर्वात चांगली आहे गुंतवणूक करायला?" त्यांची अपेक्षा होती मी त्यांना रेडीमेड काहीतरी योजना सुचवावी. मात्र माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा होता 'यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी काहीच माहिती नाही तर यांना सल्ला कसला देणार?' ही माझी समस्या मांडताना 'एका व्यक्तीचं अन्न दुसऱ्या व्यक्तीसाठी विष ठरू शकतं' या अर्थाची इंग्रजी म्हण मी त्यांना सांगितली.
माझा अनुभव असा आहे की बऱ्याच लोकांना 'गुंतवणूक सल्लागार' म्हणजे नक्की काय, या विषयी मोठे गैरसमज असतात. त्यांना वाटतं की हे लोक फक्त पैशांची गुंतवणूक करून देतात किंवा फक्त श्रीमंत लोकांनाच त्यांची गरज असते. प्रत्यक्षात एक गुंतवणूक सल्लागार त्याच्या क्लाएन्टना अनेक प्रकारे मदत करत असतो आणि श्रीमंत लोकांपेक्षा त्यांची जास्त गरज मध्यमवर्गीयांना असते. कारण जेवढी आपली संसाधनं मर्यादित तेवढे त्यांचे नियोजन जास्त महत्त्वाचे.
अर्थसाक्षर क्लाएन्ट-
आर्थिक नियोजन -
जोखीम क्षमता -
विमा संरक्षण -
गुंतवणूक -
आर्थिक नियोजनाचा आराखडा -
हे वाचून तुम्हाला कल्पना येईल की अचानक कोणी 'कुठल्या योजनेत पैसे गुंतवू?' असं विचारलं की आमच्यासारख्यांना किती त्रास होतो. गुंतवणूक सल्लागाराचे काम हे व्यापक आणि सर्वसमावेशक असते. तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी थोडीफार तरी माहिती असल्याशिवाय गुंतवणूक सल्लागार तुम्हाला योग्य सल्ला नाही देऊ शकत.
या सर्वांपलीकडे एक महत्त्वाचे काम तुमचा गुंतवणूक सल्लागार बजावत असतो ते म्हणजे तुमची गुंतवणूकीची शिस्त आणि संयम राखणे, कठीण समयीदेखील तुमचा आत्मविश्वास जागृत ठेवणे. कारण गुंतवणूकदारांच्या वर्तणुकीवरील संशोधनातून असे लक्षात आले आहे की केवळ धरसोड वृत्ती आणि स्वतःच्या निर्णयांविषयी आत्मविश्वासाचा अभाव यांमुळे त्याचं सर्वात जास्त नुकसान होत असतं. त्यामुळे आपली गरज ओळखा आणि योग्य फी भरून व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेण्यास लाजू नका.
- प्राजक्ता कशेळकर
(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजनतज्ञ असून गेल्या ७ वर्षांपासून त्या आर्थिक नियोजनाची सेवा देत आहेत. प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा: https://pro-f.in/contact-us/ )
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-

