Monday, 03 Feb, 3.48 pm अर्थसाक्षर

नवे लेख
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४

 • भांडवल वृद्धी -

  • या पर्यायामध्ये आपल्या गुंतवणुकीचा परतावा हा योजनेच्या निव्वळ मालमत्ता मूल्य च्या (NAV) वाढीमध्ये दिसून येतो.

  • उदाहरणार्थ जर मूळ एनएव्ही (NAV) जी रु.१० आहे ती वाढून जर रु.१२ झाली तर रु.२ ही आपली भांडवल वृद्धी आहे. आपण जेव्हा आपली गुंतवणूक वाढलेल्या एनएव्ही (NAV) वर काढतो तेव्हा आपल्याला अल्पकालीन (Short Term) किंवा दीर्घकालीन (Long Term) भांडवल वृद्धी कर (Capital Gain Tax) भरावा लागतो.

  • जर ३ वर्षाच्या आत गुंतवणूक काढली, तर अल्पकालीन भांडवल वृद्धी कर भरावा लागतो आणि ३ वर्ष नंतर गुंतवणूक काढली, तर दीर्घकालीन भांडवल वृद्धी कर भरावा लागतो.

  • इक्विटी फंडाच्या गुंतवणुकीमध्ये १ वर्षाच्या आत गुंतवणूक काढल्यास दीर्घकालीन भांडवल वृद्धी कर लागतो. मात्र १ वर्ष नंतर विथड्रॉ केल्यास अल्पकालीन भांडवल वृद्धी कर ही जी कर प्रणाली आहे ती सध्याची आहे पुढे सरकारच्या धोरणानुसार ह्यात बदल होऊ शकतो.

 • लाभांश पर्याय-

  • या पर्यायामध्ये म्युच्युअल फंड योजनेच्या कामगिरीनुसार लाभांश देत असतात. ' एनएव्ही' मध्ये झालेली वाढीतून लाभांश दिला जातो, मात्र सेबी च्या (SEBI) नियमानुसार फंड मॅनेजर्सना प्रथम त्यांनी केलेल्या मार्केटमधील गुंतवणुकीतून एनएव्ही वाढीचा फंडाच्या मालमत्तेमध्ये झालेला नफा बाजूला काढावा लागतो. त्याला वितरणीय अधिशेष (Distributable Surplus) असे म्हणतात. ह्या नफ्यामधूनच गुंतवणूकदारांना डिव्हिडंड दिला जातो.

 • लाभांश पुनर्गुंतवणूक

  • आणखी एक पर्याय असतो तो म्हणजे लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment).

  • यामध्ये लाभांशाची रक्कमेचे युनिट्स गुंतवणूकदाराच्या मूळ युनिट्समध्ये जोडले जातात.

  • म्युच्युअल फंडाचा लाभांश हा गुंतवणूकदाराच्या हातात पूर्णपणे करमुक्त असतो, मात्र म्युच्युअल फंड लाभांश वाटण्याचा अगोदर सरकारला लाभांश वितरण कर (Distribution Tax) जमा करतात.

 • (म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

  nilesh0630@gmail.com

  (लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

  Dailyhunt
  Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: ArthaSakshar
  Top